कृषी विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

परभणी - येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातर्फे तर्फे डिसेंबर- 2017 मध्ये औरंगाबाद येथे "जागतिक वातावरण बदल : शेती व जलक्षेत्रावर होणारे परिणाम' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार आहे. यात विविध देशातील शास्त्रज्ञांचा सहभाग असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. 

परभणी - येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातर्फे तर्फे डिसेंबर- 2017 मध्ये औरंगाबाद येथे "जागतिक वातावरण बदल : शेती व जलक्षेत्रावर होणारे परिणाम' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार आहे. यात विविध देशातील शास्त्रज्ञांचा सहभाग असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. 

परिषदेत परभणी कृषी विद्यापीठासह राहुरी, अकोला, दापोली येथील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी, औरंगाबाद) तसेच पुणे येथील कृषी संशोधन व तंत्रज्ञान नियतकालिक यांचा यात सहभाग राहणार आहे. 14 ते 16 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या या परिसंवादात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक तथा शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. राजेंद्रसिंह परोडा, हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाहू संस्थेचे (इक्रिसॅट) महासंचालक डॉ. डेव्हिड बर्गव्हिन्सन, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे आदींची प्रमुख उपस्थिती असेल. आयोजन समितीत चारही कृषीविद्यापीठांच्या कुलगुरूंचा समावेश असून, सल्लागार समितीमध्ये श्रीलंका, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ व देशातील इतर कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचा समावेश आहे. परिसंवादाविषयी संपूर्ण माहिती www.ccaw2017.org या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याची माहिती परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक तथा मुख्य आयोजक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली. 

काय असेल परिसंवादात 
वातावरण बदल, परिवर्तन व प्रक्रिया, शेतीवरील परिणाम, या बदलाची तीव्रता कमी करणे, हवामान बदल व जलसाठे, शेतीचे गणित, जनावरांवर हवामान बदलास जुळवून घेण्याची प्रक्रिया, वातावरणातील बदल व आपत्ती व्यवस्थापन, पावसातील खंड, हवामान बदलावर आधारित शेती, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट या विषयावर मंथन होणार आहे.

Web Title: International seminar Agricultural University