मराठीचे भवितव्य उज्वल : फादर फ्रान्सिस दिब्रिटो (सविस्तर मुलाखत वाचा)

सुशांत सांगवे
मंगळवार, 7 जानेवारी 2020

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्याची पालखी ही संत गोरोबांच्या दारी अर्थात, मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये अवघ्या काही दिवसांत पोहोचणार आहे.

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्याची पालखी ही संत गोरोबांच्या दारी अर्थात, मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये अवघ्या काही दिवसांत पोहोचणार आहे.

या संमेलनाचे अध्यक्षपद ख्रिस्ती धर्मगुरूंकडे असूनही मराठी संतांच्या प्रेमात पडलेले, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.

Image result for father francis dibrito

संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात कोणता विचार केंद्रस्थानी असणार आहे? याची अनेकांना उत्सुकता आहे. काय सांगाल?

- माझे भाषण लिहून तयार झाले आहे. ते जवळजवळ 50 पानांचे आहे. मराठी भाषा, साहित्य, आपल्या आजूबाजूचे आजचे वातावरण, आपले जगणे हेच विषय केंद्रस्थानी आहेत. काहींना मराठी भाषा नष्ट होईल, अशी भीती आहे. मला ही भीती वाटत नाही. या बाबतीत मी आशावादी आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असल्या तरी मराठी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण अजूनही जास्त आहे. मराठीतून उत्तमोत्तम साहित्य निर्माण होत आहे. नवे लेखक एका ताकदीने, तळमळीने, निष्ठेने लिहीत आहेत. त्यामुळे या शेकडो वर्षे जुन्या असलेल्या भाषेला धक्का लागणार नाही, असे वाटते.

मात्र, दुसऱ्या बाजूने भाषा संवर्धनाचे काम सुरूच रहायला हवे. इंग्रजी येणे ही आजची गरज बनली आहे. पोटापाण्यासाठी अनेकजण या भाषेकडे वळतात. या दृष्टिकोनातून आणि मातृभाषा म्हणूनही महाराष्ट्र इथे कमी पडला आहे, हे वास्तव आहे. सरकारने वेळीच ठाम भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, मराठी भाषेबाबत आजवर पुरेसे प्रयत्न झाले नाहीत.

काय सांगता - सत्तारांना थेट मुख्यमंत्रीच व्हायचंय?

संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर अनेकांनी आपले कौतुक केले. मात्र, काहींनी नाराजीचा सूरही आळवला. ही नाराजी कशातून आली, असं वाटतं?

- आपण लोकशाही देशात राहतो. त्यामुळे विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण, तो कायद्याच्या चौकटीत राहून झाला पाहिजे. जेव्हा संमेलनाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली तेंव्हा या निर्णयाचे अनेकांनी कौतुकच केले. वर्तमानपत्रात तसे अग्रलेखही प्रसिद्ध झाले. पण, ज्यांनी नाराजी व्यक्त केली, त्यांनी आनंद व्यक्त करायला हवा होता, असे मला वाटते.

कारण ख्रिश्चन धर्मातील मराठी लेखकाची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ही घटना तशी वेगळी आहे. आजवर ही संधी कोणाला मिळाली नव्हती. मला मिळालेला हा सन्मान, हा गौरव फादर स्टीफन, रेव्हरंड टिळक, लक्ष्मीबाई टिळक अशा अनेक लेखक-विचारवंतांचा आहे, असे मी समजतो. त्यांचे योगदान खरोखरीच खूप मोठे आहे. त्या वाटेवरून जाण्याचा माझा प्रयत्न आहे.

गूड न्यूज -  घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा 

Related image

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय असो किंवा मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याचा विषय... याकडे सरकारने कायमच दुर्लक्ष केले आहे?

- हे खरे आहे की सरकार दरबारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय रेंगाळला आहे. सरकारने नेमलेल्या भाषा तज्ञांच्या समितीने याबाबतचे सर्व पुरावे, अहवाल सरकारकडे सादर केले आहेत. पण त्यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही.

सरकारचे या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून मी नक्कीच प्रयत्न करेन. आजवरच्या सर्व माजी संमेलनाध्यक्षांना एकत्र आणून आम्ही याबाबत एकत्रित आवाज उठवू. दुसरीकडे, मराठी भाषा विद्यापीठ, मराठी भाषेचे धोरण रखडलेले आहे. हे विषयही मार्गी लावण्याच्या प्रयत्न करू.

महाराष्ट्रात मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ झालेच पाहिजे. सध्याचे मुख्यमंत्री हे मराठीप्रेमी आहे. ते आणि त्यांच्या पक्षाने वेळोवेळी मराठी भाषेच्या हिताची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतील आणि प्रश्न सोडवतीलही, अशी मला आशा आहे.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

सध्या समाजात धार्मिक तेढ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बदलत्या वातावरणाकडे तुम्ही कसं पाहता?

- धर्माचा आध्यात्मिक प्रभाव वाढायला हवा. तो प्रभाव वाढला तर जीवन संपन्न होते. पण तसे होताना दिसत नाही. धर्माचा समाजाच्या कल्याणासाठी वापर करता येतो. जीवन जगण्याची कला त्यातून आत्मसात करता येऊ शकते. मात्र, सध्या धर्माचे नाव वापरून एकमेकांत तेढ वाढवले जात आहे.

नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. भ्रष्टाचार वाढत आहे. तो समाज जीवनाचा एक भाग बनला आहे. धर्माचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. अशा काळात धर्म कशासाठी आहे, हा प्रश्न धुरीणांनी स्वतःला आणि आपल्या अनुयायांना विचारायला हवा.

अनुयायी कशाप्रकारे वागत आहेत? आपले कर्तव्य ते विसरत आहेत. हा एक प्रकारचा पराभव आहे. हे चित्र बदलायला हवे, असे मला वाटते. हत्यार म्हणून धर्माचा वापर कोणी करू नये.

Related image

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

पण, हे चित्र कसे बदलता येईल? धर्म ही समाजासमोरील प्रमुख समस्या आहे का?

- धार्मिक तेढ कमी करण्यासाठी आपल्याला व्यापक लढा द्यायला हवा. आजच्या बदलत्या स्थितीत कोण्या एकट्याला हा लढा देता येणार नाही. समविचारी लोकांनी एकत्र येऊन याबाबत पावले उचलायला हवीत.

धार्मिक द्वेषात अडकण्यापेक्षा देशाच्या आर्थिक सुधारणांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. बेकारी, सततचा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हे प्रश्न अग्रस्थानी यायला हवेत. पण, या प्रश्नांना प्राधान्य मिळताना दिसत नाही. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.

आपला देश महासत्ता होईल, अशी स्वप्न आपण पाहतो. पण, मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. हे आपल्याला परवडणारे नाही. लेखक-विचारवंतांनी या विषयावर लिहिले-बोलले पाहिजे.

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

मराठी संतांच्या भाषा सौंदर्याने आपल्याला मोहवून टाकले. पण, मुळात मराठी संत साहित्याकडे तुम्ही वळलात कसे?

मी तरुण असताना मराठी संत साहित्य वाचू लागलो. वाचनातून गोडी वाढू लागली. बायबल आणि संत साहित्यातील अनेक बाबी मिळत्या-जुळत्या आहेत, हे मला कळू लागले. जे का रंजले गांजले... हीच भूमिका बायबलमध्येही आहे. दोन्हीकडे मानवतेच्या कल्याणाच्या भावना, उद्देश एकच आहे. हे समजल्यानंतर मी समान दुवे शोधत गेलो. त्यातून संत साहित्याची गोडी आणखी वाढली.

वास्तविक, आपल्याला सर्वधर्मसमभावाची शिकवण आहे. त्यात फादर म्हणून शिकवण घेत असताना सर्व धर्माचा अभ्यास करावा लागतो. तो करत असताना मराठी भाषा, मराठी भाषेचे सौंदर्य याच्या अधिक जवळ आलो.

त्याच काळात एकेदिवशी पु. . देशपांडे यांची भेट झाली. मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करू, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर त्यांनी 'तुकाराम गाथा वाचा', असा सल्ला मला दिला होता. खरंतर तो सल्ला नाही, शिकवणच होती. भारतीय संतांची शिकवण आणि प्रभू ख्रिस्ताची शिकवण याचा परिपाक जीवनात करण्याचा प्रयत्न करत आलो आहे.

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

धर्मग्रंथाचे भाषांतर करणे, किती अवघड आहे. हे शिवधनुष्य आपण कसं पेललात?

- 'सुबोध बायबल' हा ग्रंथ तयार व्हायला जवळजवळ एक तपाचा काळ लागला. हे भाषांतर करणे खूप आव्हानात्मक आणि जबाबदारीचे काम होते. ते मी स्वीकारले. त्यासाठी मला वेगवेगळ्या धर्म पंडितांनी मदत केली.

संपादक आनंद हर्डीकर यांच्याकडूनही मोलाची मदत झाली. जितके सोपे करता येईल तितके सोपे भाषांतर केले. वाचणाऱ्याला हा ग्रंथ समजावा म्हणून आम्ही जवळजवळ 1900 टिपा दिल्या. सांगण्यासारखी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ख्रिश्चन वाचकापेक्षा मराठी वाचक या ग्रंथाला जास्त मिळाला, याचा मला जास्त आनंद आहे. या ग्रंथाचे झालेले स्वागत ही माझ्यासाठी कायमच प्रेरणा देणारी घटना आहे.

जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

Image result for father francis dibrito

सामाजिक कामात सहभागी होणं, हा आपला पिंड राहिला आहे. व्यवस्थेविरोधात तुम्ही लढा दिला. ठाम भूमिका घेतली. पण, इतर लेखक भूमिका घेताना दिसतात का?

सामाजिक कामात भाग घेणे हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे. मी नुसते चर्चमध्ये बसून राहत नाही. गोरगरिबांचे, दु:खीतांचे अश्रू पुसणे, त्यांच्या हाकेला धावून जाणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे जास्त महत्वाचे आहे.

वसईतील पर्यावरणाचा प्रश्न जटिल झाला होता. हिरव्या पट्ट्याचे नागरी पट्ट्यात रूपांतर करण्यात आले होते. त्यानंतर काही गुंड प्रवृत्तीचे लोक नागरिकांच्या जमिनी बळकावू लागले. त्यामुळे एकूणच वातावरण दूषित झाले. त्यावेळी मी 'सुवार्ता'मध्ये होतो.

मी गप्प बसून राहिलो नाही. समविचारी लोकांना एकत्र करून आम्ही अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला. अनेकांचा त्यात सहभाग होता. त्यामुळे ती एक लोकचळवळच बनली होती. आमच्या प्रयत्नानंतर राज्यकर्त्यांना जाग आली.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरून सध्या देशभर गदारोळ सुरू आहे. या विषयाकडे तुम्ही कसे पाहता? सरकारच्या एखाद्या धोरणावर किंवा निर्णयावर टीका केली तर त्या व्यक्तीवर देशद्रोही असा शिक्का मारणे कितपत योग्य आहे?

या विषयावर मी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सविस्तर बोलणार आहे. पण, इथे एक मुद्दा मांडावासा वाटतो... घटनेने आपल्या सर्वांना समान हक्क दिला आहे. आपण घटनेचा मान राखायला हवा. तिचे पालन करायला हवे.

घटना ही आपल्या सर्वांसाठी प्रमाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वीच सांगून ठेवले आहे की, व्यक्तिपूजा हा मोठा धोका आहे. मात्र, तो धोका नेहमी असतो आणि निरनिराळ्या स्तरावर असतो... वास्तविक, भयमुक्त वातावरण निर्माण करणे, हे सरकारचे काम आहे. भय निर्माण करणे हे नव्हे.

सरकारने लोकांना आधार द्यायला हवा. मी याआधी आणीबाणी विरोधात 'साधना'मध्ये पुष्कळ लिहिले आहे. घाबरलो नाही. अनेकदा अशी भूमिका घेताना त्याचे परिणाम भोगावे लागतात. आजवर लोकशाहीच्या कित्येक रक्षणकर्त्यांनी ते भोगलेही आहेत.

हेही वाचा - शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या मदतीने लागला या बहुचर्चित खुनाचा छडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interview of Father Francis D'britto Marathi Sahitya Sammelan Osmanabad