तयारी विधानसभेची : औरंगाबादमध्ये कॉंग्रेसच्या 52 जणांनी दिल्या मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

कॉंग्रेसतर्फे जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी मंगळवारी (ता.30) तब्बल 52 जणांनी मुलाखती दिल्या. विशेष म्हणजे, शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी कन्नड व पैठण येथून निवडणूक लढविण्यास उत्सुकता दाखविली आहे. शहरातील पश्‍चिम मतदारसंघासाठी सर्वाधिक दहा उमेदवार आहेत. 

औरंगाबाद - कॉंग्रेसतर्फे जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी मंगळवारी (ता.30) तब्बल 52 जणांनी मुलाखती दिल्या. विशेष म्हणजे, शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी कन्नड व पैठण येथून निवडणूक लढविण्यास उत्सुकता दाखविली आहे. शहरातील पश्‍चिम मतदारसंघासाठी सर्वाधिक दहा उमेदवार आहेत. 

कॉंग्रेसतर्फे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी प्रवक्ते सचिन सावंत आणि महिला आघाडीच्या सरचिटणीस कमलताई व्यवहारे यांनी घेतल्या. पैठण मतदारसंघातून अनिल पटेल, विनोद तांबे आणि भाऊसाहेब भोसले यांनी मुलाखती दिल्या. मध्य मतदारसंघातून हिसाम ओस्मानी, मकसूर खान, सागर मुगदिया, अय्युब खान यांनी मुलाखती दिल्या. पूर्व मतदारसंघातून इब्राहिम पठाण, अहेमद हुसेन, सरताज पठाण, मोहसीन अहेमद, युसूफ मुकाती, जी. एस. अन्सारी तर पश्‍चिममध्ये जितेंद्र देहाडे, साहेबराव बनकर, प्रदीप शिंदे, सचिन शिरसाट, चंद्रभान पारखे, पंकजा माने, जयप्रकाश ननवरे, राणोजी जाधव, सुनीता तायडे यांनी मुलाखती दिल्या. कन्नड मतदारसंघातून नामदेव पवार, अनिल सोनवणे यांनी मुलाखती दिल्या.

सिल्लोड मतदारसंघातून प्रभाकर पालोदकर, श्रीराम महाजन तर फुलंब्रीतून ताराबाई उकिरडे आणि अनिल मानकापे यांनी मुलाखत दिली. माजी आमदार डॉ. कल्याण
काळे नांदेडमध्ये निरीक्षक म्हणून गेलेले होते. त्यामुळे ते मुलाखत देऊ शकले नाहीत. वैजापूर मतदारसंघातून पंकज ठोंबरे यांनी मुलाखत दिली. गंगापूरमधून किरण पाटील डोणगावकर, कलीम सय्यद, संजय जाधव यांनी मुलाखती दिल्या. यावेळी विलास औताडे, प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहर जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, प्रभाकर पालोदकर, गटनेते भाऊसाहेब जगताप, महिला आघाडीच्या सरोज मसलगे यांची उपस्थिती होती. 
   
पक्षाच्या कार्यक्रमात कधी दिसला नाहीत? 
यावेळी काही नवख्यांनी देखील तिकिटाची मागणी केली. त्यावर श्री. सावंत यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी असता का?, तुमची माझ्याशी कधी भेट झालीच नाही, असे प्रश्‍न केले.त्यावर इच्छुकांची कोंडी झाली. साहेब, आपण याठिकाणी भेटलो होतो, त्याठिकाणी मी कार्यक्रम घेतला होता, असे सांगत काहींनी वेळ मारून नेली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interviews for Assembly elections