मोदींच्या हस्ते गॅस प्रमाणपत्र मिळालेली महिला आहे तरी कोण?

औरंगाबाद : नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी आयशा शेख यांना उज्ज्वला गॅस योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित भगतसिंग कोशारी, देवेंद्र फडणवीस, पीयूष गोयल.
औरंगाबाद : नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी आयशा शेख यांना उज्ज्वला गॅस योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित भगतसिंग कोशारी, देवेंद्र फडणवीस, पीयूष गोयल.

औरंगाबाद - ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे ऑरिक स्मार्ट सिटीत मोदी यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सक्षम महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उज्ज्वला गॅस योजनेचा आठ कोटींचा टप्पा पूर्ण करण्यात आला. विशेष म्हणजे आठ कोटी क्रमांकाचा गॅस हा अजिंठा येथील आयशा शेख यांना मिळाला. पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना गॅसचे प्रमाणपत्र देण्यात आले. हे गॅस प्रमाणपत्र घेतल्यानंतर आयशा शेख यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. 

अजिंठा गावात शेख रफिक आणि आयशा दहा वर्षांपासून रोजंदारी करीत आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. रफिक यांना पाच भाऊ आहेत. त्यांचे लग्न झाल्यामुळे ते वेगळे राहतात. आयशा या पती आणि पाच मुलांसाबोत किरायाच्या घरात राहतात. परिस्थिती बेताची असल्यामुळे घरचा रोजचा स्वयंपाक हा चुलीवरच करण्यात येत होता. 

आयशा म्हणाल्या, "महिनाभरापूर्वी उज्ज्वला योजनेत नाव नोंदविले. दोन दिवसांपूर्वी आम्हाला गॅस मिळाल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर या गॅसचे प्रमाणपत्र पंतप्रधानांच्या हस्ते मिळणार असल्याचे एजन्सीचालक श्री. देशमुख यांनी सांगितले. पहिल्यांदा विश्‍वास बसला नाही; मात्र आज विश्‍वास बसला. माझे काम फक्‍त घर आणि रोजंदारी एवढ्यापुरतेच. हेच माझे विश्‍व असल्याचे आयशा यांनी सांगितले.'' त्यांच्यासह या कार्यक्रमात सिल्लोड तालुक्‍यातील खंडाळ्याच्या सुलताना विनोद बोरडे, लोहगाव (ता. पैठण) येथील मंदाबाई पाबळे, जन्मू-काश्‍मीर येथील निर्गिस बेगम, झारखंडच्या रांची जिल्ह्यातील रेखा देवी यांनाही पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. 
 
मुलांमुळे पती येऊ शकले नाहीत 
मोदींच्या हस्ते योजनेचे प्रमाणपत्र मिळाल्याचे भाऊ आणि नातेवाइकांनी टीव्हीवर पाहिले. मुले लहान असल्यामुळे पती या कार्यक्रमाला येऊ शकले नसल्याचेही आयशा यांनी सांगितले. शेख रफिक म्हणाले, ""योजनेत नाव आल्याचे एजन्सीचालकाने सांगितले. पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र मिळाले. मुलांमुळे कार्यक्रमास जाता आले नाही. या गॅसमुळे आता जेवण लवकर बनेल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com