राज्यात गुंतवणूक वाढली; उत्पादन घटले : उद्योगमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

औरंगाबाद - ‘गेल्या पाच वर्षांत राज्यात ३ लाख कोटींनी गुंतवणूक वाढली आहे. ५ लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य असताना, प्रत्यक्षात आठ लाख कोटी झाली; तसेच २८ लाख रोजगार निर्माण झाले. औद्योगीकरणात राज्य पहिल्या क्रमांकावर असले तरीही उत्पादनात मात्र साडेचार टक्‍के घट झाली, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता. २९) दिली.

राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणासंदर्भात शुक्रवारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादेत मराठवाड्यातील उद्योजकांचे चर्चासत्र झाले. त्या वेळी ते म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत २० लाख नवे रोजागारनिर्मितीचे लक्ष्य असताना २८ लाख निर्माण झाले. सेवा क्षेत्रातही वाढ झाली. मात्र, उत्पादनात घट झाली. पाच वर्षांत १२ टक्‍के उद्दिष्ट होते. ते  केवळ ७.५० टक्‍केच पूर्ण झाले. 

Web Title: Investment in the state increased Production declined says subhash desai