आयपीएलवर सट्टा; बीडध्ये सहा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

बीड : इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या शुक्रवारी (ता. १८) दिल्लीत झालेल्या सामन्यादरम्यान बीडमध्ये सट्टा घेणाऱ्या सहा जणांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री रंगेहाथ पकडले. यामधील दोघे नाशिक शहरातील आहेत. शहरातील बुंदेलपुरा भागात केलेल्या या कारवाईत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रशांत चित्रसेन बुंदीले, आकाश सुरेंद्रसिंग बुंदीले, सुजित ब्रबूवानसिंग बुंदेले  (बुंदेलपुरा, बीड) बलराम सच्चाराम फुलवाणी (वसंत हौसिंग सोसायटी, मनमाड, नाशिक), प्रदीप श्रीचंद फुलवाणी (शिवाजीनगर, मनमाड. नाशिक), सुनील पंजूमल टेकवाणी (सारडा नगरी, बीड) अशी आरोपींची नावे आहेत. 

बुंदेलपुरा भागातील एका घरात हा सट्टा बाजार सुरु होता. चेन्नई आणि दिल्ली या दोन संघात खेळवण्यात आलेल्या सामन्यवर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षकांच्या पथकातील सहायक निरीक्षक अमोल धस, गणेश नवले, महेश चव्हाण, विजय पवार, अश्विनकुमार सुरवसे, विठ्ठल देशमुख यांनी ही कारवाई कली. कारवाईत आरोपींकडून १६ मोबाईल, एक लॅपटॉप, एक टीव्ही व रोख सहा हजार २८० रुपये व एक दुचाकी असा एकूण एक लाख ५८ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाही आरोपींना जेरबंद करण्यात आले असून शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला.
 
Web Title: ipl betting; Six suspects arrested