‘इसिस’चा प्रसादात विष कालविण्याचा होता डाव

औरंगाबाद - इसिसशी संबंध असल्यावरून अटकेतील संशयित तरुणांना मंगळवारी न्यायालयात नेताना एटीएसचे पथक.
औरंगाबाद - इसिसशी संबंध असल्यावरून अटकेतील संशयित तरुणांना मंगळवारी न्यायालयात नेताना एटीएसचे पथक.

औरंगाबाद - एटीएसने मुंब्रा व औरंगाबादेतून अटक केलेल्या इसिसच्या नऊ समर्थक संशयितांच्या चौदा दिवसांच्या कोठडीत माहिती समोर आली आहे. मंदिरात वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादात विष कालविण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी पदार्थसुद्धा तयार केल्याचे एटीएसने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे एटीएसचे विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत ता. १४ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.

एटीएसच्या पथकाने ता. २२ जानेवारीला उम्मत-ए-मोहम्मदिया या ग्रुपच्या मुंब्रा आणि औरंगाबादेतील इसिसच्या संशयितांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना मंगळवारी (ता. पाच) विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांच्यासमोर हजर केले असता तपास अधिकाऱ्यांनी गेल्या चौदा दिवसांमध्ये इसिसच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात माहिती प्राप्त केली असून, त्यांच्या ताब्यातून संगणकांच्या हार्डडिस्क, विषारी द्रव्य जप्त करण्यात आले. मुंबई, पुणे आणि औरंगाबादेतील मंदिर परिसरात वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादात विष कालविण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी विष टाकून तसा पदार्थदेखील तयार केला असून तो पदार्थ जप्त करण्यात आला आहे. परदेशात यांनी कोणासोबत चॅटिंग केली, याबाबतच्या माहितीसाठी त्यांच्याकडून इलेक्‍ट्रॉनिक डाटा जप्त केला आहे. त्याची तपासणी करावयाची आहे, हार्डडिस्कचा पासवर्ड मिळवून ती उघडून तपास करवयाचा असल्यामुळे पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायलयाने वरील आदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com