शेतकरी राहतोय पिक वीमा भरण्यापासून वंचित

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 19 जुलै 2019

हिंगोली : शासनाची महा ऑनलाईन हि वेबसाईट बंद असल्यामुळे सेतू सुविधा केंद्रातून सातबारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पिकविमा भरण्यापासून हजारो शेतकरी वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात शासनाच्या सेतू सुविधा केंद्रातून शेतकऱ्यांना सातबारा आणि इतर शेती विषयक कागदपत्रे शेतकऱ्यांना दिली जातात. त्यामुळे या ठिकाणावरून अगदी पाच ते दहा मिनीटात सातबारा, होल्डींग आणइ इतर प्रमाणपत्र काढणे सोईचे झाले आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात सातबारा घेण्यासाठी होणारी गर्दी कमी झाली होती. या शिवाय सेतूमधून सातबाराही कमी वेळेत मिळत असल्याने शेतकऱ्यांची सोय झाली होती.

हिंगोली जिल्ह्यात आता पर्यंत झालेल्या चौदा टक्के पावसातही  सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे आता पावसाच्या प्रतिक्षेत असलेले शेतकरी पीक विमा भरण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून महा ऑनलाईन हि वेबसाईटच बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. सातबारा मिळत नसल्याने तलाठ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.

त्यातच कहर म्हणजे ऑनलाईन पिकविमा भरण्याची वेबसाईट देखील संथ गतीने सुरु असल्याने दिवसभरात आठ ते दहा शेतकऱ्यांचाच  पीक विमा भरला जात आहे. त्यामुळे एकीकडे सातबारा साठी तलाठी कार्यालयात रांगा तर दुसरीकडे पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर रांगा यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर सातबारा अभावी हजारो शेतकरी पिकविमा भरण्यापासून वंचीत राहण्याची वेळ  आली आहे.

पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या : डॉ. सतीष पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य
जिल्हयातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता ता. चोवीस जुलै पर्यंत पीक विमा भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने पीक विमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी. या संदर्भात शासनाकडे पत्र पाठविणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issues of crop insurance faced by farmers