आयटीआयचे 'ते' विद्यार्थी पास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

औरंगाबाद - औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील सर्व्हेअरच्या एम्प्लॉयबिलिटी स्कील पेपरमुळे राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना नापासचा शिक्‍का लागला होता. सर्व्हेअर विषयाची उत्तरसूची पुन्हा लावल्यानंतर त्यातील अनेक विद्यार्थी पास झाले आहेत. याविषयी "सकाळ'ने पाठपुरावा केला होता.

राज्यभरातील अनेक आयटीआयमध्ये सर्व्हेअर आणि वेल्डर या ट्रेडचे विद्यार्थी नापास झाले होते. सर्व्हेअरच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित आयटीआयकडे निकालाबाबत आक्षेप नोंदविले. इतर विषयात पास आणि या दोन विषयांत शून्य गुण मिळाल्याने विद्यार्थीही चक्रावले होते. आयटीआय सेमिस्टर दोनचा निकाल 3 नोव्हेंबरला लागला. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर प्राचार्यांनी संचालकांकडे धाव घेतली होती. नापास विद्यार्थ्यांच्या आक्षेपावर थेट नवी दिल्लीच्या डायरेक्‍टोरेट जनरल एम्प्लॉयमेंट ऍण्ड ट्रेनिंगतर्फे (डीजीईटी) विद्यार्थ्यांची बाजू घेतली होती. उत्तरसूची पुन्हा लावण्यात येणार असल्याचेही संचालकांनी सर्व आयटीआयला पत्राद्वारे कळविले होते.

दरम्यान, नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेच्या अर्जाची अंतिम मुदत एक डिसेंबर होती. ती आता 30 डिसेंबरपर्यंत आहे. नापास विद्यार्थ्यांसाठी 660 रुपये, तर रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी 550 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.

Web Title: iti student pass