जाधव कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

नांदेड : वसमत तालुक्यातील इंजनगाव (शिवपुरी) येथील पाडुरंग जाधव आणि सुशिला जाधव हे दाम्पत्य शनिवारी (ता. 19) रात्री साडेआठच्या सुमारास गावाकडे जात होते. याच वेळी गावच्या वळणरत्यावर पाठीमागे आलेल्या एका आॅटोरिक्षाने दोघांना जबर धडक दिली. रविवारी (ता. 20) सुशिला पाडुरंग जाधव यांचे ब्रेन डेंड झाल्याची घोषित रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली होती.

परंतु एकाच वेळी दोघा पतीपत्नीस गंभीर दुखापत झाल्याने पती पाडुरंग जाधव यांचे शनिवारी (ता. 19) पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. तर दुसरीकडे सुशिला जाधव यांचे ब्रेन डेंड झाल्या आसा जाधव कुटुंबियांवर दुहेरी आघात झाला. दुखाचा डोंगर कोसळलेला असतांना ‘सकाळ’ ‘तनिष्का’च्या जिल्हा सन्वयक स्वाती गव्हाणे यांनी मावशी सुशिला जाधव यांचे अवयवदान करण्यासाठी जाधव कुटुंबियाची परवानगी मिळवली. आणि रविवारी काकाची अंत्यविधी उरकुन आल्यानंतर सोमवारी (ता. 21) दुःखाची परवाह न करता जाधव कुटुंबियासोबत थेट नांदेडचे रुग्णालय गाठुन मावशीचे अवयव करण्याचा धाडशी निर्णय घेतला.

दुपारी बारा वाजता ब्रेनडेड अवयवदात्या सुशिला जाधव यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सुरुवातीस रक्तदाब कमी असल्याने त्यांचा रक्तदाब सुरळीत करण्यात आला अाहे. सध्या त्यांच्या हार्ट, किडनी, लिव्हर, डोळे, अशा महत्वपूर्ण अवयवांच्या विविध तपासण्या सुरु आहेत. त्या नंतर यांच्या अवयवांची कार्यक्षमता तपासून नंतर कोणते अवयव कुठे जाणार या बद्दल कळविण्यात येणार आहे.

Web Title: Jadhav family has decided to donate organs