जालना : कोरोना चाचण्याला वेग; अँटिजेन टेस्टच्या दहा हजार किट प्राप्त 

corona virus image.jpg
corona virus image.jpg

जालना : जालना जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार कोरोना रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तांचा शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रांवर सध्या जिल्हा प्रशासनाकडून भर दिला जात आहे. एप्रिल ते आतापर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १५ हजारांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. 

दरम्यान कोरोना चाचण्यांचे प्रमाण अधीक वाढविण्यासाठी आता जिल्हा प्रशासनास तब्बल दहा हजार अॅंटीजेन टेस्ट किट प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांच्या कोरोना चाचण्या वेगाने होणार आहे. 

जालना जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण एप्रिल महिन्यात आढळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढत होत गेली. परिणामी कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतल्यानंतर कोरोना चाचणीसाठी सुरूवातीच्या काळात पुणे, नंतरच्या काळात औरंगाबाद येथे जिल्हा प्रशासानाची धावपळ सुरू होती. त्यात कोरोना चाचणीचे अहवाल येण्यास विलंब ही लागत होता. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे कोरोना चाचणी प्रयोग शाळा मंजूर करून घेत ती सुरू ही केली आहे. या कोरोना चाचणी प्रयोग शाळेसह जिल्ह्यात अॅंटीजेन टेस्टव्दारे कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून अॅंटीजेन टेस्ट करणे सुरू केले आहेत.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  
मागील चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात तब्बल १५ हजारांपेक्षा अधिक जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २६०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अँटिजेन टेस्टवर अधिक भर दिला आहे. अॅंटीजेन टेस्टव्दारे कोरोना चाचणी करण्यासाठी तब्बल दहा हजार कीट जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाल्या आहेत.

त्यामुळे कोरोना चाचण्यात अधिक वाढ होणार आहे. परिणामी शहरी भागासह ग्रामीण भागातही  टेस्टव्दारे कोरोना चाचणी करून अवघ्या काही वेळेत कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होणार आहे. परिणामी कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार आहे. 

कोरोना चाचण्या वाढविण्यात येत आहेत. त्यासाठी अॅंटीजेन टेस्टव्दारे कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे दोन दिवसांपूर्वी  अँटिजेन टेस्टसाठी लागणाऱ्या दहा हजार किट उपलब्ध झाल्या आहेत.
- रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना.

 

संपादन - प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com