मुलींना विकणारी टोळी जेरबंद जळगाव जिल्ह्यातून दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

जालना/ वाकोद ता. जामनेर - जालना शहरातील अल्पवयीन मुलीला विकणाऱ्या एका टोळीचा सदर बाजार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वी औरंगाबाद येथील माहिलेसह राजस्थान येथील एकाला अटक केली होती. त्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील दोघांना मंगळवारी (ता.१०) अटक केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०१७ ला शहरातील एका अल्पवयीन मुलीला औरंगाबाद येथील महिलेने राजस्थानमध्ये विकल्याची तक्रार जालना सदर बाजार पोलिस ठाण्यात नोंद झाली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली. त्यानंतर या प्रकरणात एक टोळी सक्रिय असल्याचे तपासात लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी राजस्थान येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासणी सूत्रे फिरवून राजस्थानातील वृषभदेव (ता. खेरवाडा, जि. उदयपूर) येथून सुजितकुमार मोतीलाल लोहार याला अटक केली आणि पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला वडिलांच्या ताब्यात दिले. आरोपी लोहार याला जालना येथे आणून त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

जळगावशी धागेदोरे
या प्रकरणाचे धागेदोरे जळगावशी जुळत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिस उपनिरीक्षक एस. पी. त्रिनेत्रे यांनी पथकासह मंगळवारी पहूर पोलिस ठाण्याला भेट देऊन त्यांच्या मदतीने वाकोद येथील सुरेश शिवारे व अन्य एका ठिकाणावरून सुभाष भोई या दोघांना अटक केली. या प्रकरणात आणखी दोघे आरोपी असून मुलींची विक्री करणारी ही टोळी मोठी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Web Title: jalana marathwada news crime