जालनाजवळ ट्रॅव्हल अपघातात एक ठार; 21 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

जालना- पुण्याहून हिंगोलीकडे निघालेल्या खुराना ट्रॅव्हल कंपनीच्या बसला आज (शुक्रवार) पहाटे 5च्या सुमारास अपघात झाला. यामध्ये एक ठार तर 21 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे.

जालना- पुण्याहून हिंगोलीकडे निघालेल्या खुराना ट्रॅव्हल कंपनीच्या बसला आज (शुक्रवार) पहाटे 5च्या सुमारास अपघात झाला. यामध्ये एक ठार तर 21 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून प्रवाशांना घेऊन हिंगोलीकडे 9 डिसेंबर रोजी निघालेली खुराना कंपनीची खासगी सबराज बस (क्रमांक एम पी -13 पी 4599) औरंगाबादमार्ग बदनापूर येथे 4च्या दरम्यान पोचली. बदनापूर पासून 3 किलोमीटर अंतरावर मात्रेवाडी पूलाच्या अलीकडे चालकास डुलकी लागल्याने बसवरील ताबा सुटला. बस भरघाव वेगात असल्याने दुभाजका वरून विरुध्द दिशेला जाऊन पलटी झाली. बसने दोन ते तीन पलट्या खाल्ल्याने बस मधील प्रवासी जखमी झाले.
जखमींमध्ये उज्वला दशरथ हौसे, रावजी हरीभाऊ, गणेश बर्डे, राजवी दशरथ हाके, स्वरांजली हाके, उज्ज्वला हाके, (सवरखेड़ा, जि. हिंगोली) निवृत्ती टेकाले, संदीप तिकोले, शेख मोशिन, अन्नपूर्णा भावराज, संध्या वाघमारे, चेतन सुभास खिस्ते, बैणाबाई बर्डे, (रा. सवरखेड़ा, जि. हिंगोली) केतकी वाघमारे, अम्रुता धाकतोड, दुर्गा बर्डे, नेहा बर्डे, बाबासाहेब चव्हाण, जयश्री चव्हाण, राणी धाकतोड़े, सोपान बोर्डे, रमेश घूगे, उमा कौर हे जखमी झाले आहेत. हरीभाऊ तुकाराम वाळवे (रा. ऊकडी, जिल्हा अकोला) हे मृत्युमुखी पडले आहेत. जखमींना जालना येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना औरंगबादला हलविण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामेश्र्वर रेंगे, जमादार ए. एस. अम्भोरे, आर. एस. बुध्वंत यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Web Title: jalana: one dead 21 injured in travel accident

टॅग्स