जळगावचा खूनी नांदेडातून अटक

प्रल्हाद कांबळे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नांदेड : जळगावच्या रामानंदनगर ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून करून मागील एक वर्षापासून नाव बदलून फरार खूनी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने सोमवारी (ता. 13) दुपारी केली. 

जळगाव जिल्ह्यातील रामानंद ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा खून करून आरोपी मलींगसिंग मायासिंग बावरी याने नांदेड गाठले. तो नांदेडच्या चिखलवाडी भागात किरायाने आपले नाव बदलून व अस्तित्व लपवत चीनी मातीची भांडी तयार करती होता. त्याच्याविरूध्द सन 2017 मध्ये वरील ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जळगाव पोलिस त्याचा शोध घेत होते. परंतु तो त्यांना सापडत नव्हता.

अखेर पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील फरार व पाहीजे आरोपीच्या शोधात सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे, फौजदार कल्याण नेहरकर, सदानंद वाघमारे, कर्मचारी जसवंतसिंह साहु, राजू पांगरीकर, बालाजी सातपुते, दत्ता वाणी, दशरथ जांभळीकर, मनोज परदेशी आणि घुंगरुसिंग टाक हे गस्त घालत होते. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन गोकुळनगर भागातील रमामाता आंबेडकर चौकात या पथकाने मलिंगसिंग बावरी याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून एक तलवार जप्त केली. शिवाजीनगर ठाण्यात त्याच्याविरूध्द भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. जळगावच्या खूनात त्याचे दोन नातेवाईक अद्याप फरार असल्याचे श्री. दिघोरे यांनी सांगितले. 

Web Title: Jalgaon murderer arrested from Nanded