अकरावी विज्ञानसाठी गुणवत्ता यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

जळगाव - अकरावीच्या प्रवेशाला गेल्या आठवड्यापासून सुरवात झाली असून, विज्ञान शाखेची पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी पाचला जाहीर करण्यात आली. यंदा अकरावी प्रवेशासाठी शहरातील मुख्य पाच महाविद्यालयांत दोन हजार १६० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी तब्बल तीन हजार ६२ अर्ज महाविद्यालयांमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी आज दोन हजार ७६ विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीत प्रवेश निश्‍चित झाला. 

यंदा शिक्षण विभागातर्फे विज्ञान शाखेचे प्रवेश हे गुणवत्तेनुसार करण्याचे आदेश आल्याने शहरात तब्बल साडेतीन हजार अर्ज दाखल झाले होते. यात अर्जांची छाननी करून आज महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता यादी लावण्यात आली. यात सर्वाधिक मेरिट हे मू. जे. महाविद्यालय व बेंडाळे महाविद्यालयाचे लागले आहे. 

६ जुलैला दुसरी फेरी
विज्ञान शाखेची आज पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उर्वरित प्रवेशांसाठी गुरुवारी (ता. ६) सायंकाळी ४ वाजता दुसरी फेरी होणार आहे. यंदा विज्ञान शाखेसाठी प्रवेशसंख्या कमी व विद्यार्थी संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

यादी पाहण्यासाठी गर्दी
गुणवत्ता यादी जाहीर होताच शहरातील मू. जे. महाविद्यालय, बेंडाळे महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय व धनाजी नाना विद्याप्रबोधनी महाविद्यालयात आपले नाव बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. 

Web Title: jalgaon news list science

टॅग्स