मिनी लॉकडाउनला विरोध करत उघडली दुकाने, व्यापारी महासंघाचा पुढाकार

Traders Opposes Mini LockDown In Jalna
Traders Opposes Mini LockDown In Jalna

जालना : जिल्ह्यात लागू केलेल्या मिनी लॉकडाउनला जिल्हा व्यापारी महासंघाने विरोध करत सोमवारी (ता.१२) दुपारीनंतर मुख्य बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना आपापल्या आस्थापना उघण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी प्रशासनाने आदेश धुडकावत आपल्या आस्थापना उघडल्या.  जालना जिल्ह्यात लाॅकडाऊन लागू केल्यानंतर जिल्हा व्यापारी महासंघाने विरोध दर्शविला होतो. मिनी लॉकडाउन दरम्यान सुमारे ७० टक्के मार्केट सुरू असून मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी कायम आहे.

त्यामुळे कापड, सराफा, मोबाईल शॉपी आदी आस्थापना मिनी लॉकडाउनमध्ये बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिली आहेत. त्यामुळे प्रशासनने व्यापाऱ्यांचा विचार करून व्यापाऱ्यांना त्यांच्या आस्थापना सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैसाल गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा व्यापारी महासंघाने केली होती.

मात्र, शसनासह प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या आस्थापना सुरू करण्याबाबत काहीच निर्णय घेतला नाही.  त्यामुळे सोमवारी (ता.१२) जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्केटमध्ये फिरून व्यापाऱ्यांना आपापल्या आस्थापना सुरू करण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापना उघडल्या आहेत. 


मार्केटमधली व्यापाऱ्यांच्या आस्थापना वगळता तर सर्व आस्थापना सुरू आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये नागरिक खरेदीसाठी येत आहेत. अशात व्यापाऱ्यांच्या आस्थापना प्रशासनाने बंद केल्या. व्यापाऱ्यांना जीएसटी भरणे आहे. साठा तपासणी करणे आहे. अशात आस्थापना बंद ठेवून ही कामे होणार नाहीत. तसेच उद्या गुढीपाडवा आहे. अशावेळी आस्थापना बंद ठेवणे म्हणजे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आस्थापना सुरू करण्याचे आवाहन करीत आस्थापना उघड्या केल्या आहेत. प्रशासनाला कारवाई करायची असेल तर सर्वांवर करावी.

- विनीत सहानी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ, जालना.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com