Jalna News
Jalna Newssakal

Jalna News: धुक्यात हरवले जालना शहर...

जालना : मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर वाढला आहे. त्यात बुधवारी (ता.चार) मध्यरात्री शहरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. परिणामी गुरूवारी (ता.पाच) हुडहुड वाढ झाली. शिवाय पहाटे शहरात यंदाच्या हिवाळ्यातील पहिले धुके जालनेकरांनी अनुभवले.

यंदा जिल्ह्यात थंडीचा जोर दिसून आला नाही. हिवाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर जालनेकरांनी अनुभवला. मात्र, त्यानंतर हिवाळ्यात थंडीचा जोर कमी झाला. परंतु, मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यात बुधवारी शहरासह जिल्ह्यात वाऱ्याने थंडीत भर पडली होती.

शिवाय मध्यरात्रीनंतर शहरात पावसाच्या हलक्या सरी ही कोसळल्या. त्यामुळे वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला. शिवाय गुरूवारी पहाटे शहरात सर्वत्र धुके पसरले होते. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या जालनेकरांनी थंडीचा अनुभव घेतला. दरम्यान, या बदलेल्या वातावरणाचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सर्दी, खोकल्याचा त्रास होण्यास सुरवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com