डॉक्टरांनाच कोरोनाची धास्ती : रुग्णांवर तोंडी उपचार करून पाठवणी 

महेश गायकवाड
गुरुवार, 26 मार्च 2020

अनेकांना गंभीर त्रास होत असताना आवश्यक तपासणीही केल्या जात नाही. उपचारासाठी आलेल्या सर्वाना नोंदणीसाठी तसेच औषधी घेण्यासाठी एकाच रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे वृद्ध व दिव्यांगाचे मोठे हाल होत आहेत.

जालना : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आलेला नाही. सर्व सामान्यांपेक्षा जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनीच या विषाणूची एवढी धास्ती घेतली, की उपचारासाठी आलेल्या रुग्णाला हात लावण्याचीही तसदी डॉक्टर घेत नसल्याचे चित्र आहे.

रुग्णाला दोन हात दूर ठेवून आजाराबाबत तोंडी विचारपूस करून केवळ औषध लिहून देण्याचा सपाटा डॉक्टरांनी लावला आहे. या प्रकारामुळे आता रुग्णाच्या आजारांचे नेमके निदान होत आहे, की अंदाजपंचे औषधीचा मारा सुरू आहे, हीच मोठी पंचाईत होऊन बसली आहे. 

वैजापुरातून कोरोना संशयित गायब

संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक गोष्टींसाठीच नागरिक बाहेर पडत आहे. या काळात जिल्हा सामान्य रुग्णलयात अनेक गरीब रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र, त्यांच्या प्रत्येक आजारावर केवळ औषधी लिहून देऊन सोपस्कार पार पाडल्या जात आहे. 

अनेकांना गंभीर त्रास होत असताना आवश्यक तपासणीही केल्या जात नाही. उपचारासाठी आलेल्या सर्वाना नोंदणीसाठी तसेच औषधी घेण्यासाठी एकाच रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे वृद्ध व दिव्यांगाचे मोठे हाल होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Civil Hospital Coronavirus Doctor News