जालनाकरांना दिलासा : कोरोना रिकव्हरी रेट ७८ टक्के, मृत्यूदर २.५ वर

corona virus image.jpg
corona virus image.jpg

जालना : मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार अतिशय झपाट्याने वाढत आहे. मात्र, जिल्हा कोविड रूग्णालयातील डॉक्टरांकडून कोरोनाबाधितांवर होत असलेल्या योग्य उपचारामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाण वाढ झाली आहे. परिणामी आज जिल्ह्यातील कोरोना रिकव्हरीचा रेट हा तब्बल ७८ टक्क्यावर गेला आहे.

त्यामुळे ही बाब जालनाकरांसाठी दिलासा देणारी आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाची भिती बागळत मास्क वापरणे, फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करणे, सतत हात साबन किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करणे या तीन बाबी कोरोनापासून बचाव करून शकतात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

जालना शहरात एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला होता. याच काळात लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन महानगरांमधून लाखो लोक जिल्ह्यात परत आले होते. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही वाढत गेली. परिणामी प्रत्येक दिवसाला शेकडो कोरोनाबाधित रूग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल आठ हजार ७५९ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधिताची संख्या झपाट्याने वाढत असताना जिल्हा कोविड रूग्णालयातील डॉक्टरांकडून कोरोनाबाधितांवर होत असलेल्या योग्य उपचारांमुळे तब्बल सहा हजार ५९१ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा रिकव्हरीचा रेट हा तब्बल ७८ टक्के आहे. ही बाब दिलासा देणारी आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनामुळे आतापर्यंत २१८ जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोना मृत्यू दर हा २.५ टक्क्यांपर्यंत जाऊन पोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी ही काळजी आवश्‍यकच 
लॉकडाउन उघडल्यानंतर संपूर्ण बाजारपेठ खुले झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होत आहे. तसेच अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसून येतात. फिजिकल डिस्टन्सींगचे पालन ही होताना दिसत नाही.  त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. कोरोनापासून स्वतःला सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सींग व सतत साबणाने हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. 

सात जण व्हेंटिलेटरवर 
जिल्हा कोविड रूग्णालय येथे सात कोरोनाबाधित रूग्ण हे व्हेंटिलेटरवर (एनपी) आहेत. तर एकूण १८ रूग्णांची स्थिती गंभीर आहे. तसेच जिल्ह्यात १९७ कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यात जिल्हा कोविड रूग्णालय येथील १३५ तर खासगी रूग्णालय येथील ६२ कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार ७५९ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा हजार ५९१ रुग्ण उपचारानंतर  कोरोनामुक्त झाले आहेत. कोविड रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधिताचा रिकव्हरी रेट हा ७८ टक्क्यावर गेला आहे. तर मृत्यू दर हा २.५ टक्के आहे. 
डॉ, अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकीत्सक, जालना.

​(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com