Corona : जालन्यात दीड हजार बाधितांवर उपचार, आज ५२ जणांनी केली मात!

उमेश वाघमारे  
Wednesday, 7 October 2020

बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. 

जालना : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची भर पडत असली तरी गेल्या काही दिवसांपासून ही संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय उपचारानंतर बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. सध्या एक हजार ५५१ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी (ता.सात) नव्याने ३८ रुग्णांची भर पडली, तर ५२ जणांनी कोरोनावर मात केली. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

परतूर येथील आदर्श कॉलनीतील ७५ वर्षीय पुरुष, औरंगाबाद शहरातील एन ११ हडको भागातील ६६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या २३१ वर पोचली आहे. नवीन ३८ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या आठ हजार ८८१ वर गेली. नव्या रुग्णांत आरटीपीसीआरद्वारे २३ तर अॅंटीजेन टेस्टमधून १५ पॉझिटिव्ह आले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यात जालना शहरातील सामान्य रुग्णालय निवासस्थान येथील चार, तालुक्यातील लिंबोणी येथील दोन, शहरातील कृष्णानगर, सोमनाथ जळगाव, श्री कॉलनी, समर्थनगर, श्रीकृष्णनगर येथील प्रत्येकी एक, अंबड शहरातील शिवाजीनगर, चांगलेनगर, जवाहर कॉलनीतील प्रत्येकी एक, परतूर तालुक्यातील आष्टी येथील एक, घनसावंगी तालुक्यात कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, देवहिवरा, मंगुजळगाव येथील प्रत्येकी एक, भोकरदन, जळगाव सपकाळ, विरेगाव, वालसा वडाळा येथील प्रत्येकी एक, इतर जिल्ह्यांतील एकाचा समावेश आहे. 

आणखी ५२ रुग्ण कोरोनामुक्त 
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील ५२ रुग्ण उपचारानंतर आज कोरोनामुक्त झाले. त्यांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत सात हजार ९९ रुग्ण बरे झाले आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अलगीकरणात १९८ जण 
जालना जिल्ह्यातील १९८ जणांना बुधवारी (ता.सात) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यात जालना शहरातील बद्रीनारायण बारवाले मुलींच्या वसतिगृहात सात, वन प्रशिक्षण केंद्र येथील वसतिगृहात एक, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर ए ब्लॉकमध्ये आठ, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर एफ ब्लॉकमध्ये २४, पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ५०, परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये एक, केजीबीव्ही येथे ११, मंठा येथील केजीबीव्ही येथे पाच, अंबड येथील वसतिगृहात १३, शासकीय मुलींच्या वसतिगृहात एक, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २६, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात नऊ, घनसावंगी येथील वसतिगृहात ३१, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात पाच जणांचा समावेश आहे. 

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Corona Update news