
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी (ता.१८) सकाळी नव्याने २३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
जालना : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी (ता.१८) सकाळी नव्याने २३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल एक हजार २८१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी ७५६ जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
जालना जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. प्रत्येक दिवसाला कोरोना बाधितांची संख्येत भर पडत आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल एक हजार २८१ कोरोना बाधित रूग्ण झाले आहेत. यात शनिवारी (ता.१८) सकाळी २३ कोरोना बाधित रूग्णांची भर पडली आहे. तर शुक्रवारी (ता.१७) रात्री एकाच पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने ५२ जणांचे बळी घेतले आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण ७५६ जण कोरोनामुक्त झाले आहे. तर सध्या जालना येथे ४३७ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर ३७ कोरोना बाधितांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
(संपादन : प्रताप अवचार)