esakal | Corona Updates : जालना जिल्ह्यात १८२ जणांना कोरोनाची लागण, उपचारानंतर ६७ रुग्ण बरे
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Corona Updates

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून पुन्हा संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

Corona Updates : जालना जिल्ह्यात १८२ जणांना कोरोनाची लागण, उपचारानंतर ६७ रुग्ण बरे

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात मंगळवारी (ता.नऊ) १८२ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली असून एका कोरोनाबधिताचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ४०५ कोरोनाबाधितांना जीव गेला आहे. तर ६७ कोरोनाबाधित बरे झाले, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या एक हजार २५७ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाचा फैलावर सुरू आहे. मंगळवारी निष्पन्न झालेल्या १८२ कोरोनाबाधितांपैकी तब्बल ९५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

जालना तालुक्यातील दरेगाव येथील चार, इंदेवाडी, जळगाव येथील प्रत्येकी तीन, वाघ्रुळ येथील दोन, हस्तेपिंपळगांव, कारला, खरपुडी, कुंभेफळ, पिरकल्याण, वंजार उम्रद येथील प्रत्येकी एक, परतूर शहरातील तीन, तालुक्यातील येनोरा येथील सहा, वाटुर येथील दोन, ब्राम्हणवाडी, हातडी, आष्टी येथील प्रत्येकी एक, घनसावंगी तालुक्यातील गुंज, साकळगाव, अंतरवाली राठी येथील प्रत्येकी एक, अंबड शहरातील सहा, पाथरवाला, गोंदी येथील प्रत्येकी एक, बदनापूर शहरातील तीन, तालुक्यातील अकोला येथील तीन, नजीक पांगरी येथील दोन, जाफराबाद शहरातील दोन, टेंभुर्णी, पवारवाडी येथील प्रत्येकी दोन, माहोरा, सवानसी, वाढोणा, वरुड येथील प्रत्येकी एक, भोकरदन शहरातील चार, तालुक्यातील लोणगाव, वालसावंगी येथील प्रत्येकी तीन, लालगढी येथील दोन, दानापुर, इब्राहिमपुर, राजूर, थिगळखेडा येथील प्रत्येकी एक व बुलडाणा येथील आठ, औरंगाबाद दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे आतापर्यंत १७ हजार १ कोरोनाबाधित आढळलेले आहेत. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ४०५ जणांचा कोरोनामुळे बळी गेलेला आहे. दरम्यान, ६७ जण मंगळवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे १५ हजार ३३९ जण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात एक हजार २५७ कोरोनाबधितांवर उपचार सुरू आहेत.


जिल्ह्यात ६९ जण अलगीकरणात
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून पुन्हा संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरातील वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे ६०, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर डी ब्लॉक येथे आठ व घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे एक जणाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
--------------
कोरोना मीटर

---
एकूण कोरोनाबाधित : १७ हजार १
एकूण कोरोनामुक्त : १५ हजार ३३९
एकूण मृत्यू : ४०५
उपचार सुरू : १ हजार २५७
---

संपादन - गणेश पिटेकर

loading image