Jalna News : पीक विम्यात शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीवर कारवाई करा

आमदार दानवे यांच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत सूचना
crop loan
crop loanesakal

भोकरदन : भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नसेल अशा शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करुन बनावट भाडेपट्टा तयार करीत पीक विम्याची रक्कम स्वतःच्या बॅंक खात्यावर वळती करुन शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी (रॅकेट) उघडकीस आली आहे. टोळीची सखोल चौकशी करुन संबंधित आरोपीवर कठोर कायदेशिर कार्यवाही करण्याच्या सूचना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी नुकत्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या.

गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी व गावोगावी सक्रीय झालेल्या दलालांशी संगनमत करुन लाखो रुपयांची भ्रष्टाचार करणारी टोळी राज्यात सक्रीय झाली असून त्या बाबतच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार संतोष दानवे यांच्याकडे केल्या होत्या.

सदर तक्रारींचा संदर्भ देऊन आमदार संतोष दानवे यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे संबंधित टोळीचा पर्दापाश करुन शेतकयांचे होणारी लाखो रुपयांचे नुकसान टाळण्याबाबत मुद्दा उपस्थित केला आहे.

जिल्हाधिकारी विजय राठोड व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रणदिवे यांनी तातडीने जिल्हयामध्ये झालेले सर्वच शेतीचे भाडे पट्टे व सदर भाडे पट्टयाच्या आधारे भरलेल्या पिक विमा प्रकरणांची पडताळणी सुरु केली असून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या दलालांवर जिल्हाधिकारी जालना यांच्याकडून कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे.

‘‘पिक विम्यासंदर्भात जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्याची फसगत झाली असल्यास तालुक्याचे कृषी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करावी. पोचपावतीची छायांकित प्रत आपल्या मोबाईल नंबरसह माझ्या भोकरदन येथील संपर्क कार्यालयात जमा करावी.’’

संतोष दानवे, आमदार व जिल्हाध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com