Jalna Crime News : चार हातभट्ट्यांवर छापे Jalna district city liquor produced kilns | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Crime News

Jalna Crime News : चार हातभट्ट्यांवर छापे

Jalna Crime News : शहरातील कैकाडी मोहल्ला येथे स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (ता.पाच) पहाटे पाच वाजता छापे टाकून चार हातभट्ट्या नष्ट केल्या. शिवाय चार जणांवर गुन्हे दाखल केले असून, चार लाखांचा मुद्देमाल नष्ट केला.

शहरासह जिल्ह्यात अवैध दारूच्या हातभट्ट्यांवर गावठी दारू तयार केली जाते. त्यात मंगळवारी (ता. ६) होळी असल्याने अवैध दारूची विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूच्या अड्ड्यावर रविवारी (ता.पाच) पहाटे शहरातील कैकाडी मोहल्ला येथे छापा टाकला.

यावेळी एकूण चार हातभट्ट्या नष्ट केल्या आहेत. यावेळी गावठी दारू, रसायन व इतर साहित्य असा एकूण चार लाख दोन हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. शिवाय दोन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, अंमलदार सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, जगदीश बावणे, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी,

फुलचंद गव्हाणे, रंजीत वैराळ, देविदास भोजने, किशोर पुंगळे, रवी जाधव, परमेश्‍वर धुमाळ, संजय सोनवणे, सचिन राऊत, भागवत खरात, कैलास चेके, योगेश सहाने, महिला अंमलदार चंद्रकला शडमल्लु, रेणुका बांडे, अरुणा गायकवाड आदींनी केली.

टॅग्स :JalnacrimeSakalliquor ban