जालन्यात सगळेच कर्मचारी संपावर..व्यवहार ठप्प

जालन्यात सगळेच कर्मचारी संपावर..व्यवहार ठप्प

जालना : केंद्र सरकारची जनविरोधी धोरणे आणि प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी (ता.आठ) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला जालना जिल्ह्यात विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. तसेच गांधी चमन येथून डाव्या संघटनांनी मोर्चाही काढण्यात आला. 

यात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, तहसील कार्यालय, महावितरणचे कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बाल रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राचे चतुर्थ श्रेणीचे सर्व कर्मचारी, परिचारीका, आरोग्य सेवक बुधवारी (ता.आठ) संपावर गेले आहेत.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हमाल मापाडी व सर्व मजदूर संपावर गेल्याने बाजार समितीचा व्यवहार ठप्प होता. दरम्यान बुधवारी (ता.आठ) डाव्या संघटनातर्फे गांधी चमन येथून मोर्चा काढला. हा मार्चा गांधी चमन, शनी मंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. 

केंद व राज्यस्तरावरील सार्वजनिक व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी बुधवारी (ता.8) देशव्यापी संपावर गेले आहेत. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

वेतन त्रुटींचे तातडीने निवारण करावे, बक्षी समिती खंड दोन प्रसिद्ध करावे, केंद्राप्रमाणे वाहतूक, शैक्षणिक, हॉस्टेल भत्ता लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा करावा,महिला कर्मचार्यांना दोन वर्षांचे बालसंगोपन रजा मंजुर करावी, अनुकंपा भरती विना अट करावी, कंत्राटी आणि बदली कामगारांना सेवेत काय करावे, सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या एका वारसाला पूर्वीप्रमाणे शासकीय सेवेत भरती करावे, शासकीय विभागांचे खासगीकरण थांबवावे, आरोग्य विभागातील बंधपत्रित कर्मचार्यांच्या सेवा विना अट नियमित करा, शिक्षण क्षेत्रातील विन अनुदान धोरण रद्द करा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचारिकांना अठरा हजार किमान वेतन द्या आदी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com