रेल्वे राज्यमंत्री दानवेंच्या मतदार संघात युवक काँग्रेसचे मशाल आंदोलन

जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मशाल पेटवून निदर्शने
Jalna District Youth Congress agitation
Jalna District Youth Congress agitation sakal

भोकरदन : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करत त्यांच्यामागे ई.डी चौकशीचा ससेमिरा लावून केंद्रातील मोदी सरकार लोकशाहीची मुस्कटदाबी करीत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी रात्री केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे निवासस्थान असलेल्या भोकरदन शहरात जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मशाल पेटवून निदर्शने करण्यात आले.

भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने राहुल गांधी यांचा धसका घेतला असून, त्यांनी बेरोजगारी, महागाई, कोरोना काळातील ढिसाळ नियोजन, कृषी विधेयकाचे तीन काळे कायदे अशा विविध प्रश्नावर राहुल गांधींनी सरकारची कोंडी केली होती. याचा राग मनात धरून सरकार सूडबुद्धीने राहुल गांधी यांच्यावर कारवाई करीत आहे. केंद्र सरकारने नुकतीच घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशभरात आगडोंब उसळला असून, युवकांमध्ये या योजने विषयी प्रचंड रोष आहे.

ज्या प्रमाणे इंग्रज सरकार सामान्य भारतीयांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत होते, त्याचप्रमाणे मोदी सरकार सामान्य भारतीयांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी यावेळी केला. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, माजी नगरसेवक संतोष अन्नदाते, दादाराव देशमुख, रमेश जाधव, विशाल गाढे, जहीर शेख, प्रतापराव शिंदे, गालेब शहा, पंजाब देशमुख, रोशन देशमुख, महेश दसपुते, जुनेद शेख, रफिक कादरी, किशोर शिंदे, अजीम शेख, ऋषिकेश शिरोळे, सचिन गावंडे, प्रवीण निकाळजे आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com