Jalna : मक्याच्या पिकात चक्क गांजाची लागवड

भोकरदन : प्रल्हादपूर येथील प्रकार, पोलिसांकडून कारवाई
jalna
jalnasakal

भोकरदन : तालुक्यातील प्रल्हादपूर शिवारातील एका शेतात मक्याच्या पिकात, कांडी गवतात तसेच बांधावर चक्क गांजाची लागवड करण्यात आले. दरम्यान, गांजाची २१ किलो वजनाची झाडे रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भोकरदन पोलिसांनी कारवाई करून जप्त केली. याप्रकरणी दगडूबा धोंडिबा खेकाळे (रा.प्रल्हादपूर) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर शिवारात दगडूबा धोंडिबा खेकाळे या व्यक्तीने स्वतःच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी पथकासह दगडूबा यांच्या शेतात रविवारी सकाळी छापा टाकला.

तेव्हा मका व कांडी गवताच्या शेतात तसेच शेतातील बांधावर गांजाची झाडे लावलेली व त्या झाडांचे संगोपन करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कृषी सहायकांकडून गांजाच्या झाडांची ओळख पटवून घेतली. व त्याचे वजन केले असता ते २१ किलो ७०० ग्रॅम असल्याचे दिसून आले. त्याची किंमत १ लाख ३ हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी संशयित दगडूबा धोंडिबा खेकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, उपनिरीक्षक आसिफ शेख, विष्णू बावस्कर, रामेश्वर सिनकर, अरुण वाघ, अभिजित वायकोस, भाऊसाहेब लहाने, गणेश निकम, समाधान जगताप, निलेश फुसे, गणपत बनसोडे, सुनील सिंघल यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com