स्वत:च्या हाताने केली स्वत:ची शेती उध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

जालना : सध्या फळभाज्याचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे फळभाज्या विक्रीसाठीचा वाहतूक खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकर्‍याने गोबी आणि टोमॅटोची शेती स्वतःच्या हाताने फावड्याने उद्वस्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ जालना तालुक्यातील पाहेगाव येथील प्रेमसिंग लाखीराम चव्हाण यांचा असल्याचे पुढे आले आहे. 

मागील काही दिवसांपासून बाजारामध्ये फळभाज्याची आवक वाढली आहे. त्यामुळे फळभाज्याचे भाव गडगडले आहेत. भाव पडल्याने शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीवर याचा विपरीत परिणाम होत आहे.

जालना तालुक्यातील पाहेगाव येथील प्रेमसिंग चव्हाण यांनी आपल्या शेतामध्ये अर्धा एकर कोबी आणि अर्धा एकर टोमॅटो लावले होते. त्यासाठी त्यांना सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च आला. उत्पन्नही चांगले झाले. मात्र भाव पडल्याने शेतातून गोबी आणि टोमॅटो विक्रीसाठीचा वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे.

प्रेमसिंग चव्हाण यांनी परतूर येथील बाजार समिती येथे गोबीचे 10 ते 13 कट्टे विक्रीसाठी घेऊन गेले होते. मात्र त्यांना गोबीला भाव मिळला नाही. त्यामुळे काही कट्टे विक्री केले आणि काही तेथेच फेकून दिले. विक्री केलेल्या कट्ट्यांतून केवळ 442 रुपये प्रेमसिंग चव्हाण यांच्या पदरी पडले. त्यामुळे प्रेमसिंह चव्हाण यांनी ता. 14 मार्च रोजी आपल्या शेतातील गोबी आणि टोमॅटो शेती फावड्याने स्वतःचा उद्वस्त केले.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

शेतीमालाला मिळणारा कमी भाव हा शेतकर्‍यांसाठी सतत अडचणीचा मुद्दा ठरला आहे. मात्र शासन याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही, त्यामुळे पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या फळभाज्या शेतकर्‍यांना स्वतःच्या हाताने मोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने या बाबीकडे लक्ष देऊन शेतकरी हितासाठी शेतीमालाला दीडपट भाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Web Title: Jalna Farmer destroys his own farm