Jalna : पावसाळ्यात महापूर, उन्हाळ्यात वाळवंट

गुंज बुद्रुक परिसरात बंधारा नसल्याने अडचण
JALNA
JALNASAKAL

कुंभार पिंपळगाव : दरवर्षीचं पावसाळा आला की महापूर, उन्हाळा आला की पुन्हा वाळवंट,गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यासाठी उपोषण तर कधी धरणे अशी बाब गुंजकरांना नित्याचीच झाली आहे. गोदावरी पात्रात बंधारा होत नसल्याने आलेल्या पाण्याचा फक्त पाहण्यासाठीच उपयोग होत आहे. दरवर्षी पाणी येते आणि पाणी जाते.

गुंज बुद्रुक(ता.घनसावंगी) गावात गोदावरी पात्रात मिनी बंधारा उभारण्याबाबत गेल्या दोन-तीन वर्षापासून नुसत्या हालचाली सुरू आहेत.पालकमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत पाठपुरावाही केला आहे मात्र यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने गुंजसह सिरसवाडी, भादली (ता.घनसावंगी) पलीकडच्या काठावरील रिदोरी,कवडगाव, गव्हाणथडी, हिवरा,डुब्बा,काळेगाव(ता.माजलगाव)या गावातील ग्रामस्थांना सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्याचीही दरवर्षीच अडचण येत आहे.

शिवणगावचा बंधारा गुंज येथे होणार होता, मात्र जागा बदलत गेली. पाच किलोमीटर खाली हा बंधारा करण्यात आला तर लोणीसावंगीचा बंधारा चार किलोमीटर खाली गेला यामुळे गुंजसह जवळची सात पात्र गावे पाण्याअभावी तहानलेलीच राहिली. दरवर्षी उन्हाळ्यात गोदावरीचे वाळवंट होते वरच्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यासाठी उपोषण करावे लागते आणि पाणी सोडलेच तर हे पाणी गुंजपर्यंत पोहचु शकत नाही. परिणामी गुंजकरांना पावसाळ्यात फक्त महापूर पाहण्याची संधी मिळते, पाणी मात्र लगेच वाहून जाते. या पाण्यामुळे शेतीचे नुकसान होते,महापुराची भितीही वाटते मात्र पुर ओसरल्यानंतर पुन्हा सिंचनक्षेत्र वाढीसाठी अडचण येते. पाणी नसल्याने बागायती करता येत नाही.गुरा-ढोरांनाही पाणी मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com