जालन्यात केवळ 5.83 टक्के उपयुक्त पाणीसाठा ; दोन लघु प्रकल्प कोरडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

जालना ः जिल्ह्यात जून महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात मागील दोन आठवड्यापासून पुन्हा सक्रिय झाला आहे. या पावसाने खरीप पिके तरली आहे. मात्र जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात केवळ 5.83 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळात दमदार पाऊस पडला नाही, तर जिल्ह्यावरील दुष्काळाचे ढग अधिक गडद होतील.

गतवर्षी जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यात यंदाही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी भोकरदन तालुक्यातील धामना मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी ही अजूनही जोत्याखाली आहे. त्यामुळे सहा मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 11.18 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

ही परिस्थिती लघु प्रकल्पांची असून दोन लघु प्रकल्प कोरडे पडलेत. तर तब्बल 43 लघु प्रकल्पांची पाणी पातळी ही जोत्याच्या खाली आहे. त्यामुळे 13 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 3.65 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही, तर जिल्हा दुष्काळाच्या दरीत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Jalna has only 5.83% of useful water storage; Two small projects dry