Big News : जालन्यात श्रावणापर्यंत लॉकडाउन, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश

lockdown 11.jpg
lockdown 11.jpg

जालना :  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जालना शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन पुन्हा पाच दिवस वाढविण्यात आला आहे. जालना शहरात ता.२० जुलैच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बुधवारी (ता.१५) जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे आता जालना शहरात श्रावण महिना सुरु होईपर्यंत लॉकडाउन लागू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जालना शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या सर्वाधिक आहेत. त्यामुळे ता. पाच जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून ते ता. १५ जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत असा दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाउन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लागू केला होता. बुधवारी (ता.१५) लॉकडाउनचा शेवटचा दिवस होता. मात्र, चार दिवसांवर श्रावण महिना येऊन ठेपल्याने गुरूवारी (ता.१६) लॉकडाउन उघडल्यावर शुक्रवार, रविवार या दोन दिवसांमध्ये मटन दुकाने व दारूच्या दुकानांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

परिणामी शहरात पुन्हा गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्यता असल्याने हा लॉकडाउनला ता. २० जुलैच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे श्रावण महिना लागण्यापूर्वी मटणावर आणि मद्यावर तावा मारण्याचा बेत आखणाऱ्यांना आता श्रावण महिना सुरू होईपर्यंत घरात शांत बसणे आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  
दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान पंधार दिवसांचा लॉकडाउन गरजेचा आहे. त्यामुळे ता. २० जुलैच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत हा लॉकडाउन वाढविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले आहे. या पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक चैतन्य एस, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, तहसीलदार श्रीकांत भुजबळ आदींची उपस्थिती होती. 
 

(संपादन प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com