Jalna : नाफेडकडून ९४ हजार क्विंटल हरभरा खरेदी

दीड कोटीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
 quintal gram
quintal gramesakal

जालना : जिल्ह्यात यंदा नाफेडकडून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रावर आतापर्यंत तब्बल ९४ हजार ७४ क्विंटल हरभरा खरेदी केली आहे. तर १८८ शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीचे एक कोटी ६६ लाख २९ हजार १९५ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत.

खुल्या बाजारात सध्या गावरान हरभऱ्याला सरासरी चार हजार ७५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तर तीन हजार ३०० रुपये सर्वात कमी भाव मिळत असल्याचे चित्र जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पाहण्यास मिळत आहे.

विशेष म्हणजे केंद्र शासनाकडून हरभऱ्याला पाच हजार ३३५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केल्यानंतर ही खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी भाव आहे. त्यामुळे नाफेडकडून जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, मंठा, परतूर, जाफराबाद, माहोरा, जवखेडा खू, अन्वा, बदनापूर, मापेगाव खू. (वाटूर फाटा), आष्टी या अकरा ठिकाणी हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

या हरभरा खरेदी केंद्रावर आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल १९ हजार ४७१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यांपैकी १२ हजार १८५ शेतकऱ्यांना नाफेडच्या खरेदी केंद्राकडून हरभरा विक्रीसाठी घेऊन येण्याचा संदेश नोंदणी मोबाईल नंबर दिला गेला आहे. त्यांपैकी पाच हजार ९२७ शेतकऱ्यांना नाफेडला ९४ हजार ७४ क्विंटल हरभरा विक्री केला आहे.

या हरभऱ्याची हमीभावाप्रमाणे ४९ कोटी २० लाख सात हजार २० रुपये किंमत होत आहे. त्यांपैकी १८८ शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या हरभऱ्याचे नाफेडकडून आतापर्यंत तीन हजार ११७ क्विंटल हरभऱ्याचे एक कोटी ९४ लाख २९ हजार १९५ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत.

त्यामुळे नाफेडकडून हरभरा खरेदीचे पैसेही येण्यास सुरवात झाली आहे.जिल्ह्यात नाफेडकडून बारा खरेदी केंद्र सुरू केले आहेत. आतापर्यंत ९४ हजार ७४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून तीन हजार ११७ क्विंटल हरभरा खरेदीचे पैसे १८८ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केले आहेत.

— राजेश हेमके,जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जालना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com