युतीच्या नगरसेवकांचा सभात्याग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

जालना - नगरपालिकेच्या मागील सभेसंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे अवलोकन तथा अंमलबजावणी तत्काळ करा, असा आग्रह विरोधक नगरसेवकांनी धरला. मात्र आजच्या विषय पत्रिकेशिवाय बोलू नका, असे पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सभागृहास सांगितले. त्यामुळे भाजप व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला. 

टाऊन हॉल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता.३०) बोलविण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये विषयपत्रिकेवरील सर्व २५ विषय मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये जालना शहर हागणदारी मुक्तीचाही ठराव मंजूर करण्यात आला आहे. 

दरम्यान, भाजपचे नगरसेवक भास्कर दानवे म्हणाले, की नगरपालिकेची ता.२७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेमध्ये भाजप-शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. मात्र आम्हाला सही करण्यासाठी रजिस्टर दिले गेले नाही. तसेच ता.२७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे कार्यवृत्तांतामध्ये आम्ही चर्चा केलेल्या विषयांचा समावेश नाही. त्याचा समावेश करावा, अशी मागणी सोमवारी (ता.२९) जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले नाही, असे श्री. दानवे यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी यांच्या सूचना
नगरपालिकेच्या ता.२७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेसंदर्भात जिल्हाधिकारी यांनी त्या सभेमधील ठरावांची दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. जर त्यावर अंमलबजावणी केली नाही, तर कलम ३०८ नुसार ता सभा तहकूब करू, असे या पत्रात नमूद आहे.

Web Title: jalna news corporator