जालना : सात दरोडेखोर जेरबंद

उमेश वाघमारे
रविवार, 25 मार्च 2018

जालना : जालना एमआयडीसी येथील शिला व पंकज इंटरप्रयाजेस कंपनीवर दरोडा टाकलेल्या टोळीला जालना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता.24) मुंबई घाटकोपर येथून जेरबंद केले आहे. या दरोडेखोराकडून 13 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमालसह एक आयशर जप्त केला आहे.

जालना : जालना एमआयडीसी येथील शिला व पंकज इंटरप्रयाजेस कंपनीवर दरोडा टाकलेल्या टोळीला जालना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता.24) मुंबई घाटकोपर येथून जेरबंद केले आहे. या दरोडेखोराकडून 13 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमालसह एक आयशर जप्त केला आहे.

शहरातील एमआयडीसी येथील शिला व पंकज इंटरप्रायजेस कंपनीवर मंगळवारी (ता.20) मध्यरात्री  दोन सुरक्षा रक्षकाना  मारहाण करुण कही इसमानी 13 लाख 87 हजार रूपयांचा दरोडा टाकला होता. या प्रकरणी चंदनझीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी तपासाचे सूत्र हलवले आणि मुंबई येथील त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून या दरोड्यातील संशयित आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सुनील इंगले, पोलिस कर्मचारी शेख रज्जाक, विश्वनाथ भिसे, संतोष सावंत, प्रशात देशमुख, कैलास जाळव, समाधान तेलंग, वैभव खोकले, रंजीत वैराले यांची टीम मुंबई घाटकोपर येथे गेली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या टीमने अब्दुला जमीरुउल्लाअन्सारी, अब्दुल सईम यूनुस, असलम अली अकरम, अब्दुल सलीम खान, महमंद इम्रन, निजायोद्दीन , अकबर आबेद खान, इरशाद अहेमद हबीउल्ला (सर्व राहणार उत्तरप्रदेश) या सात संशयित दरोडेखोराणा अटक केली. त्यांच्याकडून दरोड्यातील 13 लाख 87 हजार रूपयांच्या मुद्देमालासह एक आईशर जप्त केला आहे. या आरोपींचा इतर गुन्हेही उघड़किस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Jalna news decoit arrested in jalna