संकटांचा डोंगर, बळीराजाचे हाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

जालना - नोटाबंदीने केलेली फरपट, कर्जमाफीसाठी बॅंकेत लागलेल्या रांगा, लांबलेला पाऊस नंतर परतीच्या पावसाने दिलेला फटका यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला. खरीप संपून रब्बीच्या पेरण्यांना सुरवात झाली; मात्र बळीराजाची अडथळ्याची शर्यत थांबता थांबेना. सध्या पिके काढणीला आली; मात्र मजूर मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. काही भागांत कापूस चोरी होत आहे. संकटांचा डोंगर वाढतानाच वीज वितरण कंपनीने थकबाकीच्या वसुलीसाठी कृषी पंपांची वीज कट केली. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता खचला आहे. 

रब्बीवर मदार 
यंदा सुरवातीपासूनच पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी फारसा समाधानकारक राहिला नाही. दुसरीकडे हाती येणारा घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. आता रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. 

गावात मजूर मिळेना 
सोयाबीन सोंगणीसह कापसाची वेचणी व रब्बीच्या पेरणीसाठी मजूर सापडत नसल्याने शेतकऱ्यांसमोर सध्या अडथळ्यांचा डोंगर आहे. त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होत आहे.  

कापूस चोरीची भीती
मजुरांअभावी कापसाची वेचणी लांबणीवर पडत असल्याने कापसाचे नुकसान होत आहे. शिवाय काही भागांत कापूस चोरीच्या घटनांमुळेही शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भाववाढीची प्रतीक्षा
दिवाळीसाठी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्री केली. सध्या सोयाबीन, मका व कापसाला समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: jalna news farmer