17 वर्षे जुन्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड; शेतकरी हतबल

विशाल अस्वार
गुरुवार, 22 मार्च 2018

"या वर्षी देखील ऐन काढणीसाठी द्राक्षे आले असता, हवामानात बदल झाला. त्यात पाऊस आणि  वाऱ्या यामुळे द्राक्षे खराब झाले. त्यामुळं बाजरात अगदी कवडीमोल दराने विक्री झाली.लावलेला खर्च देखील वसूल झाला नाही. या ऐवजी दुसरे पीक घेणे चांगले म्हणून द्राक्ष बाग तोडली." 
- अशोक भुते, शेतकरी

वालसावंगी (जि. जालना) : गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील द्राक्ष बागाचा मोठे नुकसान झाले आहे. या आसमानी संकटासह कवडीमोल भाव असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. वलसावंगी येथील एका शेतकऱ्यानं बुधवारी (ता.21) 17 वर्ष जुनी द्राक्ष बागेवर मजूर लावून कुऱ्हाड चालवली आहे.

वलसावंगी परिसरात सुमारे 100 एकरवर द्राक्ष बागा होत्या. मात्र खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा मोडीत काढल्या आहेत. त्यामुळे येथे केवळ तीनच द्राक्षबागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यात यंदा झालेली अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलाचा द्राक्ष बागावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यात द्राक्षांना मिळालेल्या कवडीमोल भावापुढे हतबल झालेल्या अशोक भुते या शेतकऱ्याने आपली 17 वर्षापूर्वीची एक एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.

कमी भाव : वेलीचे संवर्धन, खते औषधी, डिपिंग, औषधी फवारणी, मजुरी आदींसाठी  दरवर्षी हजारो रुपये खर्च येतो. या तुलनेत द्राक्षाला मिळणारा भाव हा कवडीमोल राहतो. केलेला खर्च देखील शेतकऱ्यांचा वसूल होत नाही.परिणामी आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

"या वर्षी देखील ऐन काढणीसाठी द्राक्षे आले असता, हवामानात बदल झाला. त्यात पाऊस आणि  वाऱ्या यामुळे द्राक्षे खराब झाले. त्यामुळं बाजरात अगदी कवडीमोल दराने विक्री झाली.लावलेला खर्च देखील वसूल झाला नाही. या ऐवजी दुसरे पीक घेणे चांगले म्हणून द्राक्ष बाग तोडली." 
- अशोक भुते, शेतकरी

Web Title: Jalna news farmer destroy grapes farm