बारावीचा निकाल ८८.४९ टक्‍के

बारावीचा निकाल ८८.४९ टक्‍के

जालना - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवार (ता.३०) रोजी १ वाजता जाहीर करण्यात आला. विविध शाखांचे २६ हजार १६६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी २३ हजार ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी निकाल ८८.४९ टक्‍के इतका लागला आहे. औरंगाबाद विभागात जिल्ह्याचा टक्‍केवारीत शेवटचा क्रमांक लागतो. 

जिल्ह्यात कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी शाखांच्या १५८ कनिष्ठ महाविद्यालयातील २६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील २३ हजार ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्याचा एकूण सरासरी निकाल हा ८८.४९ इतका लागला आहे. शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेत ९ हजार ४८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाखेचा निकाल हा ९५.३२ इतका आहे. कला शाखेत १३ हजार ५०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ११ हजार २३२ विद्यार्थी पास झाले आहे. कला शाखेचा सरासरी निकाल हा ८३.४८ इतका लागला आहे. वाणिज्य शाखेच्या २ हजार २८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यापैकी २ हजार २५ विद्यार्थी पास झाले आहे. वाणिज्य शाखेच्या जिल्ह्याचा निकाल हा ८८.९३ टक्‍के इतका लागला आहे. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमासाठी ४१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या शाखेचा सरासरी निकाल ८४.८२ टक्‍के इतका लागला आहे. निकालात दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातील मुुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८५.४८ टकके असून यात मुलींचा सरासरी निकाल हा ९२.५ टक्‍के इतका आहे. राज्य मंडळाच्या वतीने ऑनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर विविध इंटरनेट कॅफेवर विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली.

तालुकानिहाय निकाल
जालना तालुक्‍यात ५ हजार ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची सरासरी ८७.३९ इतकी आहे. बदनापूर तालुक्‍यात १ हजार ४८३ विद्यार्थी पास झाले असून निकालाचे प्रमाण हे ८४.२ टक्‍के आहे. अंबड तालुक्‍यातील २ हजार १७५ विद्यार्थी पास झाले असून निकाल ९०.३६ टक्‍के इतका लागला आहे. तर परतूर तालुक्‍यातून १ हजार ७७९ विद्यार्थी पास झाले आहेत. निकालाची सरासरी ही ८३.३२ इतकी आहे. घनसावंगी तालुक्‍यातून १ हजार ८८ विद्यार्थी पास झाले असून निकालाची सरासरी ही ८०.६५ इतकी आहे. मंठा तालुक्‍यातील १ हजार ४०७ विद्यार्थी पास झाले असून तालुक्‍याचा सरासरी निकाल हा ८४.१५ टक्‍के इतका लागला. भोकरदन तालुक्‍यातील ६ हजार ८१४ विद्यार्थी पास झाले असून सरासरी निकाल हा ९२.६० टक्‍के इतका लागला. जाफराबाद तालुक्‍यातील २ हजार ६५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्‍याचा निकाल हा ९१.०२ टक्‍के लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com