ट्रकचालकाला तीन वर्षांची सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

जालना - चार वर्षांच्या मुलाला चिरडल्याप्रकरणी ट्रकचालकास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (ता.19) तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

जालना - चार वर्षांच्या मुलाला चिरडल्याप्रकरणी ट्रकचालकास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (ता.19) तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

जालना शहरातील कडबीमंडी येथे सात मे 2013 ला रॉकेलचा ट्रक खाली केल्यानंतर ट्रकचालक शेख लालमियॉं शेख शब्बीर (वय 33, रा. संजयनगर, औरंगाबाद) हा फिल्मी स्टाईलने ट्रक मागे घेत होता. येथे लहान मुले खेळत होती. दरम्यान, ट्रक मागे घेत असताना हर्षजित राजकुमार खरे (वय चार) हा ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने चार साक्षीदारांची साक्ष तपासली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ट्रकचालक आरोपी शेख लालमियॉं शेख शब्बीर याला तीन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

Web Title: jalna news marathi crime

टॅग्स