पालिकेला मॉन्सूनपूर्व कामांचा विसर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

जालना - यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. जालना नगरपालिकेने सुमारे दीड महिन्यापूर्वी मॉन्सूनपूर्व कामाची ठेकेदाराला वर्कऑर्डर दिली आहे. मात्र, मे महिना संपत आला तरीदेखील मॉन्सूनपूर्व स्वच्छतेची कामे जालना शहरात सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील तुंबलेली गटारांची स्वच्छता होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जालना शहरातील मोठ्या नाल्यांसह रस्त्यालगतच्या नाल्याही सद्यःस्थितीमध्ये तुंबलेल्या आहेत. याची प्रचिती अनेकदा नळाला पाणी आल्यानंतर येते. त्यामुळे शहरातील मॉन्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामासाठी नगरपालिकेने तब्बल २३ ते २५ लाख रुपयांची निविदा काढली. नगरपालिकेने शहरातील नाल्या, मोठे गटार स्वच्छ करण्यासाठी दीड महिन्यांपूर्वी ठेकेदाराला कामाचे आदेशही दिले आहेत; मात्र संबंधित ठेकेदाराने अद्यापही काम सुरू केले नाही. त्यात यंदा मॉन्सून लवकर दाखल होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मॉन्सूनपूर्व स्वच्छतेची कामे निम्म्यावर होणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही.  

स्वच्छतेबाबत निवेदन
शहरातील मोठ्या नाल्यांची सध्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्या पूर्वी नगरपालिकेने स्वच्छता करावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे बुधवारी (ता. २३) केली आहे.  

दीड महिन्यापूर्वी मॉन्सूनपूर्व कामे करण्यासंदर्भात ठेकेदाराला वर्कऑर्डर दिली आहे. त्याने काम सुरू केले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला बुधवारी (ता. २३) नोटीस बजाविली आहे. जर दोन-तीन दिवसांमध्ये काम सुरू झाले नाही, तर संबंधित ठेकेदाराची निविदा रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना.

Web Title: jalna news municipal corporation forgets Pre-monsoon work