जालन्यात बंदला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे तर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या गाडीसह अन्य दोन पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. तर एक खाजगी गाडी पेटून दिली. दरम्यान शहरातील भोकरदन नका येथे अज्ञात व्यक्तीने बसवर दगड फेक केली

जालना - शहरातील नूतन वसाहत येथे मंगळवारी (ता. दोन) अज्ञात जमावाने दगडफेक केली. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. तरी एक खाजगी वाहन पेटून देण्यात आले.  तर पोलिसांच्या तीन व एका खाजगी गादीवर दगडफेक केल्याने काचा फुटल्या.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान आतापर्यँत जिल्ह्यात 9 बसवर दगडफेक झाल्याची माहिती आहे. कोरेगाव प्रकरणाचे हिंसक पडसाद मंगळवारी (ता.दोन) जालना शहरात उमठले. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शहरातील तरुणांनी नूतन वसाहत येथील रॅली काढत शहर बंदची हाक दिल्यानंतर काही नूतन वसाहत येथे पोलिसांवर अज्ञात जमावे दगडफेक केली.

या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे तर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या गाडीसह अन्य दोन पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. तर एक खाजगी गाडी पेटून दिली. दरम्यान शहरातील भोकरदन नका येथे अज्ञात व्यक्तीने बसवर दगड फेक केली.  जिल्हा आगारात आतापर्यंत दगडफेक झालेल्या 9 बसवर उभा करण्यात आल्यात. जालना शहरातील गांधी चमन येथील फळविक्रेत्यांचे गाडे अस्तवेस्त केले. त्यामुळे जालना शहरात तणाव पूर्ण शांतता आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवाह विभागाने बसच्या फेऱ्या रद्द केल्या.

दरम्यान यावेळी पोलिसांचा  तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: jalna news: strike agitation