रुग्णवाहिकेच्या धडकेत रिक्षातील दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मंठा - मंठा-जिंतूर महामार्गावर कर्नावळ (ता. मंठा) पाटीजवळ भरधाव रुग्णवाहिकेने धडक दिल्याने मालवाहू रिक्षातील दोन जण ठार झाले. ही घटना बुधवारी (ता. २३) सकाळी साडेसहा वाजता घडली.

मंठा - मंठा-जिंतूर महामार्गावर कर्नावळ (ता. मंठा) पाटीजवळ भरधाव रुग्णवाहिकेने धडक दिल्याने मालवाहू रिक्षातील दोन जण ठार झाले. ही घटना बुधवारी (ता. २३) सकाळी साडेसहा वाजता घडली.

जिंतूर येथून विक्रीसाठी मीठ घेऊन मालवाहू रिक्षातून चालक महेबूब शेख करीम (वय ४५) आणि शेख रशीद शेख छोटू (वय ३५) तसेच शेख मकसूद शेख लालामियाँ (वय ३२, सर्व रा. जिंतूर, जि. परभणी) हे बुधवारी (ता. २३) सकाळी साडेसहा वाजता मंठा शहराकडे येत होते. मंठा-जिंतूर महामार्गावर कर्नावळ (ता. मंठा) पाटीजवळ समोरून येणाऱ्या भरधाव रुग्णवाहिकेने त्यांना समोरासमोर धडक दिली. यात चालक महेबूब शेख आणि शेख रशीद यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक घटनास्थळावरून फरारी झाला. या अपघातात मालवाहू रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या प्रकरणी शेख मकसूद शेख लालमियाँ यांनी दिलेल्या तक्रारीवरून रुग्णवाहिकाचालकाविरोधात मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार शेख अलमगीर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: jalna news two dead in accident