पाणी योजनेच्या कामाची चौकशी करा - दानवे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

जालना - जालना शहरामध्ये नगरपालिकेअंतर्गत नगरोत्थान योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेची चौकशीची मागणी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.

ते म्हणाले की, नगरविकास विभागाच्या ता.२१ ऑगस्ट २०१४ च्या परिपत्रकानुसार या योजनेच्या कंत्राटदार यांना बिलाची अदाई करणे आवश्‍यक होते. शासनाचे ७५ टक्के व नगरपालिकेचे २५ टक्के लोकहिस्सा टाकून कंत्राटदाराला बिल अदा करणे गरजेचे आहे. मात्र नगरपालिकेने तसे न करता शासनाच्या निधीमधून पैसे देण्यात आले आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी भाजप-शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी केली.

...तर न्यायालयात जाणार - कैलास गोरंट्याल
जिल्हाधिकारी यांनी कलम ३०८ नुसार सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला तर या संदर्भात आम्ही कोर्टात जाऊ, असे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे. मागील सभेला तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकेचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते.

Web Title: jalna news water raosaheb danve