अंबड शहरातून गायब असलेल्या युवकाचा निर्घृणपणे खून

बाबासाहेब गोंटे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

गोविंदच्या डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राचे घाव आहेत.
अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह अंबड उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला आहे.

अंबड (जि. जालना) : नुतन वसाहतमधील गोविंद शिवप्रसाद गगराणी (वय 19) या रविवारी रात्री घरातून बाहेर पडलेल्या युवकाचा मृतदेह आज (सोमवार) सकाळी सापडला. त्याची निर्घृणपणे खून केल्याचे समोर आले आहे. 

गोविंदच्या नातेवाईकांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आज सकाळी साडेआठच्या सुमारास गोविंद याचा मृतदेह भालगाव रोडवर आढळून आला.

गोविंदच्या डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राचे घाव आहेत.
अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह अंबड उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला आहे.

Web Title: Jalna news youth murder in Ambad