Jalna Corruption Newssakal
मराठवाडा
Jalna Corruption News : जालन्यात पाच लाखांची लाच मागणाऱ्या महसूल अधिकाऱ्याला पुन्हा पोलिस कोठडी
Jalna News : शेतजमिनीसंबंधी याचिकेचा निर्णय सकारात्मक लागावा यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहायक महसूल अधिकाऱ्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जालना : शेतजमिनीसंदर्भातील याचिकेच्या आक्षेपाचा निकाल सकारात्मक लावण्यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहायक महसूल अधिकारी राजेंद्र श्रीपतराव शिंदे (वय ४१) यास सोमवारी (ता.१९) न्यायालायने पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.