
जालना : शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात
जालना : शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी अखेर शनिवारी शिंदे गटात जाण्याची घोषणा केली आहे. आपल्यासमोर निर्माण झालेल्या अडचणींमुळे आपण ४० वर्षांचा प्रवासानंतर आज एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत असल्याची घोषणा आयोजित पत्रकार परिषदेत करताना श्री. खोतकरांना अश्रू अनावर झाले.
मागील दोन आठवड्यापासून शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या दिल्लीवारी सुरू होती. या दिल्लीवारीत श्री.खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप खासदार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे श्री. खोतकर हे शिंदे गटात जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. शनिवारी श्री. खोतकर यांनी शिंदे गटाचे आपण समर्थ करतात आहोत, अशी घोषणा करत, या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चर्चा करून आपल्या समोरील अडचणी सांगितल्या आहेत असे श्री. खोतकर यांनी यावेळी म्हटले.
मी जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर माझ्या अडचणीत वाढ झाली. ४० वर्ष एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन मी काम केले आहे. मात्र, घरी आल्यानंतर कुटुंबाचा चेहरा दिसतो. या निर्माण झालेल्या अडचणींमुळे मी स्वतः सह कुटुंबाला सेफ करण्याचा प्रयत्न करत असून शिंदे गटासोबत गेल्याने थोडाफार तरी आधार मिळेल, अशी अपेक्षा ही श्री. खोतकर यांनी यावेळी बोलून दाखविली.
शिंदे गटाला समर्थ देताना कोणती ही राजकीय अट ठेवील नाही. मात्र, मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून भाजप खासदार रावसहेब दानवे यांच्याकडे मी लोकसभेसाठी बाय मागितला आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक ही राजकीय मागणी केली नाही. जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे ही श्री. खोतकर यांनी यावेळी म्हटले.
Web Title: Jalna Shiv Sena Deputy Leader Arjun Khotkar Joins Eknath Shinde Group Maharashtra Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..