जालना : शिवसेनेचा जालन्यात मोर्चा

बंडखोर एकनाथ शिंदेसह आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणााजी
Jalna
Jalna sakal

जालना : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने त्यांच्या विरोधात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोमवारी शिवसैनिकांनी जालना शहरात मोर्चा काढला. यावेळी बंडखोर एकनाथ शिंदेसह आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणााजी करण्यात आली.

या मोर्चात शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, डॉ. हिकमत उढाण, माजी आमदार संतोष सांबरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर,उत्तमराव वानखेडे, युवासेनेचे अभिमन्यू खोतकर,यांच्यासह शिवसेनेचे पाधिकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा मोर्चा शहरातील मामा चौक येथून निघाला. मामा चौक, सिंधी बाजार, सराफा बाजार, काद्राबाद, पाणी वेस, सुभाष चौक, मंमा देवी, मस्टगड मार्गे गांधी चमन येथे या मोर्चाचा समारोप झाला. यावेळी शिवसैनिकांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी केली. शिवाय आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून त्यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी घोषणा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com