जालन्यात पारा ४३ अंशांवर, ढगही दाटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

जालना - शहराचे बुधवारी (ता. २३) अधिकतम तापमान पुन्हा ४३.१ सेल्सिअसवर जाऊन ठेपले. त्यात दुपारी चार-साडेचारच्या आकाशात ढग दाटून आल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

मागील काही दिवसांपासून जालना शहराचे तापमान ४२ सेल्सिअसपर्यंत गेले होते. मात्र, मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील बुधवारी (ता. २३) जालना शहराचे अधिकतम तापमान हे ४३.१ सेल्सिअस, तर कमीत कमी तापमान २९.५ सेल्सिअस होते. त्यात बुधवारी शहरामध्ये आकाशात ढग दाटून आल्याने उकाड्यात अधिक भर पडली. 

त्यामुळे जालनेकर उकाड्याने अधिकच हैराण झाले. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहेत. लहान मुलांसह वृद्धांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.

Web Title: jalna temperature 43 Celsius