esakal | जालना : दुचाकीचोर सक्रिय
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीचोर

जालना : दुचाकीचोर सक्रिय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यासह शहरात दुचाकीवर चोरट्यांकडून सातत्याने डल्ले मारले जात आहे. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या दुचाक्या पुन्हा मिळणेही कठीण झाले आहे, कारण शेकडो दुचाकी चोरीचे गुन्हे पोलिसांच्या डायरीत वर्षानुवर्ष पडून आहेत. त्यामुळे आपल्या वाहनांची काळजी घेणे ही आता काळाची गरज झाली आहे.

जालना जिल्ह्यात दुचाकीचोरांचा पोलिसांना बंदोबस्त करता आलेला नाही. प्रतिदिन शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. अंबड तालुक्यातील रवना येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी ता. सहा सप्टेंबर रोजी चोरट्याने पळविली आहे. या प्रकरणी अरुण देशमुख यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: मराठवाड्यातील मुख्य पिक 'सोयाबीन' धोक्याच्या पातळीवर

तर घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी ता. एक सप्टेंबर रोजी चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी रूपेश जैन यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच जालना तालुक्यातील निरखेडा येथून ता. १० सप्टेंबर रोजी चोरट्याने दुचाकी लंपास केली आहे. या प्रकरणी भरत भुतेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दुचाकी चोरीचे गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होत आहे. मात्र, दुसरीचे चोरी गेलेल्या दुचाकी शोधण्याचे प्रमाण कमी आहे.

loading image
go to top