
Jalna News : नुकसान झालेल्या पिकांची अर्जुन खोतकरांकडून पाहणी
जालना : तालुक्यातील सिरसवाडी येथे बेमोसमी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने नुकसान झालेल्या पिकांची शिवसेनेचे उपनेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी (ता.आठ) पाहणी केली.जिल्ह्यात मंगळवारी (ता.सात) झालेल्या बेमोसमी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
या पिकांचे त्वरित महसूल प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांना पाहणी करून पंचनामे करावेत. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवावा. शिवाय गुरूवारी (ता.नऊ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांना मदत मिळून देण्याची मागणी करणार आहोत, असे यावेळी श्री. खोतकर म्हटले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कालींदा ढगे, अनुराग कपुर, सरपंच रवींद्र ढगे, माजी सरपंच कैलास ढगे, चेअरमन मनोहर ढगे, विभाग प्रमुख सुदाम ढगे, शेतकरी भगवान ढगे, श्रीहरी ढगे, नारायण ढगे यांची उपस्थिती होती.