पोलिस संरक्षण द्या; अन्यथा काम बंद

भास्कर बलखंडे
शुक्रवार, 30 मार्च 2018

जालना: गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या कार्यालयांत लोकांची कामे करताना अनेदा राजकीय दबावाला बळी पडावे लागत आहे. काही वेळा तर लोकांच्या हल्यांना सामेरे जावे लागते, त्यामुळे अधिकाऱ्यांवर प्रंचड दडपण येते. यातून सुटका करून घेण्यासाठी पोलिस संरक्षण किंवा सुरक्षा अधिकारी द्यावे, अन्यथा ता. २ एप्रिल पासून सामुहिक कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशाराही या अधिकार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनात प्रंचड खळबळ उडाली आहे.

ग्रामविकास विभागार्तगत काम करणार्‍या अधिकार्‍यांनी गेल्या काही महिन्यांपासून कार्यालयात लोकांची कामे करीत असतांना मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे निर्णय घेताना अडचणी येतात. अनेकदा तर अधिकार्‍यांवर हल्ले देखील होत असल्यामुळे मानसिक संतुलन बिघडत आहे. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करण् यात आली पंरतू त्याकडे  दुर्लक्ष करण्यात आले आहे.शासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात  आला आहे.या निवेदनावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सेवा प्रर्वगातील अधिकार् यांच्या सह्या आहेत.

आंदोलनाची कल्पना नाही : निमा आरोरा
मुख्यकार्यकारी अधिकारी निमा आरोरा यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, अधिकार् च्या आंदोलना बाबत मला काहीही कल्पना नाही. अधिकार्‍यांनी त्यांच्या मागण्यांच्या निवेदनाची आपणास प्रत दिलेली नाही.

Web Title: jalna zilla parishad employee need police protection